लोणार: ईद-ए-मिलादुन्नबी साजरी झाली सामाजिक बांधिलकीतून; १२० रक्तदात्यांचा सहभाग

लोणार (गावकरी टाइम्स/फिरदोस खान पठाण):
ईद-ए-मिलादुन्नबीचे औचित्य साधून जमियत उलेमा-ए-हिंद (लोणार) आणि सर्व सहकाऱ्यांच्या संयुक्त विद्यमाने जामा मस्जिद चौकातील इंदिरा गांधी उर्दू हायस्कूल येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून एकूण १२० रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.


'रक्तदान करा, जीवन वाचवा' हा संदेश प्रत्यक्ष कृतीत आणणाऱ्या या उपक्रमाचे उद्घाटन शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. शिबिरात संकलित झालेले सर्व रक्त संजीवनी ब्लड बँकेकडे सुपूर्द करण्यात आले.

मान्यवरांची उपस्थिती

या सामाजिक उपक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी लोणारचे ठाणेदार सदगीर साहेब, पोलीस कर्मचारी गजानन साहेब, प्रकाशभाऊ मापारी, डॉक्टर असोसिएशनचे डॉ. खुशालभाऊ मापारी, नगराध्यक्ष भूषणभाऊ मापारी, उपनगराध्यक्ष आबेदखान, शिवसेना जिल्हाप्रमुख बळीरामभाऊ मापारी, हाजी मेहमूद सेठ, माजी नगराध्यक्ष पटोले साहेब, इम्रान खान, मोमिन खान, माजी न.प. अध्यक्ष राजूभाऊ मापारी, गटनेते नितीनभाऊ शिंदे, काँग्रेस अध्यक्ष समदभाई, हाजी मसूदभाई, इंदिरा गांधी कॉलेजचे अध्यक्ष हाजी गफ्फार सेठ, प्राचार्य तौफीक कुरेशी सर तसेच प्रा. लुकमान कुरैशी सर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

परिश्रम आणि आभार

शिबिराच्या यशस्वीतेसाठी जमियत उलेमाचे अध्यक्ष ॲड. हाजी रिझवान जड्डा, मौलाना अयाज, हाफिज रझीक, मौलाना तारीक, रिझवान खान, वसीफ खान, वसीम सर, साबिर अली, इझहार सर, गफूरभाई तसेच जमजम कॉलनी व जमियत उलेमा-ए-हिंदच्या सर्व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. ईद-ए-मिलादुन्नबीचा खरा संदेश मानवसेवा आणि समाजकार्यातून पुढे नेणारा हा उपक्रम ठरल्याचे सांगत ॲड. हाजी रिझवान जड्डा यांनी सर्व रक्तदाते व उपस्थितांचे आभार मानले.
बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७ ——— बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७

Post a Comment

0 Comments