स्थानिक बसस्थानकाजवळ असलेल्या बहुचर्चित ‘नॅशनल बार’ मध्ये सुरू असलेल्या जुगाराच्या अड्ड्यावर पोलिसांनी अचानक धाड टाकून मोठी कारवाई केली आहे! हार-जीतचा जुगार खेळणाऱ्या तब्बल ७ जणांना रंगेहात पकडण्यात आले असून त्यांच्याकडून रोख रकमेसह मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत.
गुप्त बातमी अन् पोलिसांचा अचानक छापा!
१ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी सुमारे १:४० वाजेच्या सुमारास ‘नॅशनल बार’मध्ये काहीजण अवैधपणे पत्त्यांवर जुगार खेळत असल्याची गुप्त बातमी पोलीस उपनिरीक्षक विजय अजमिरे यांना मिळाली. वेळ न गमावता पंचांच्या उपस्थितीत तातडीने छापा मारण्यात आला.
हे आहेत पकडलेले आरोपी:
कारवाईदरम्यान खालील ७ आरोपी हार-जीतचा जुगार खेळताना जाळ्यात सापडले:
शेरू अली युसुफ अली
शेख रफीक शेख महंमद
शेख अकबर शेख मदन
हुसेन शहा चांद शहा
सलीम खाँ खाँजा खाँ
गनी शहा लतीफ शहा
युसुफ खान दिलदार खान
(सर्व रा. डोणगाव)
मुद्देमाल जप्त व गुन्हा दाखल
पोलिसांनी आरोपींच्या अंगझडतीत व डावावरून ₹७,२००/- रोख रक्कम आणि ५२ ताशपत्ते जप्त केले आहेत.
या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक विजय अजमिरे यांच्या फिर्यादीवरून डोणगाव पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यातील कलम ४ व ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याची नोंद पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय धिके यांनी केली असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
नागरिकांची मागणी:
डोणगाव परिसरात अवैध धंदे, बनावट मद्यविक्री आणि मोबाईलवरील सट्टा-जुगाराचे प्रकार वाढत असून, अशा सर्व अवैध धंद्यांवर पोलिसांनी कठोर कारवाई सत्र असेच सुरू ठेवावे, अशी जोरदार मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

0 Comments