वीरशैव लिंगायत समाजाच्या सामाजिक सभागृहाचे लोकार्पण; विकासासाठी जाती-पातीचे राजकारण केले नाही – आ. डॉ. संजय रायमुलकर

लोणार : (गावकरी टाइम्स/किशोर मोरे)
लोणार येथील वीरशैव लिंगायत समाजाच्या बहुप्रतीक्षित श्रीपद जगद्गुरू पलसिद्ध महास्वामी सभागृहाचे लोकार्पण बुधवारी माजी आमदार डॉ. संजयजी रायमुलकर यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. त्यांच्या विकास निधीतून उभारण्यात आलेल्या या सभागृहामुळे समाजाची अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाली असून समाज -बांधवांनी समाधान व्यक्त केले.


या कार्यक्रमास शिवछत्रप मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष नंदकिशोर मापारी, सरपंच संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अरुणमामा दळवी, सौ. मिराताई मापारी लोणार नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा, माजी नगराध्यक्ष विद्यमान नगरसेवक भूषणभाऊ मापारी, न पा चे उपाध्यक्ष आबेद खान, शिवसेनेचे गटनेते व नगरसेवक मयुर रमेशचंदजी गोलेच्छा, नगरसेवक गजानन शालीकराम मापारी, अक्षय नंदकुमार इंगळे, काँग्रेसचे गटनेते नितीनभाऊ शिंदे,भाजपचे नगरसेवक शुभम देसाई यांच्यासह समाजातील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना आ डॉ. रायमुलकर  सांगितले की मतदार संघाचा आमदार म्हणून काम करत असताना तत्कालीन मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख आ एकनाथ शिंदे साहेब यांच्या सहकार्याने आणि केंद्रीय मंत्री खा प्रतापराव जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मेहकर विधानसभा मतदारसंघासाठी सुमारे २,५०० कोटी रुपयांचा विकास निधी मागील दोन वर्षात  मंजूर करून आणण्यात आला. या निधीतून लोणार व मेहकर तालुक्यात विविध समाजांसाठी सामाजिक सभागृहे, सभामंडप तसेच लोणार येथील जैन समाजाच्या वर्धमान गौरक्षण संस्थेच्या ७ एकर जागेस संरक्षण भिंत व सामाजिक सभागृहासाठी २ कोटी ८५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला.विकासकामे करताना मी कधीही जाती-पातीचे राजकारण केले नाही. नगरपालिकेत कोणत्याही पक्षाची सत्ता असो शहराच्या विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने  मी प्रामाणिक प्रयत्न केले. जिथे विकासाची गरज होती, तिथे निधी पोहोचविण्याचे काम मी तत्काळ  केले," आ असो किंवा नसो सत्ता आपली आहे आणि नगरविकास खाते हे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांकडे आहे त्यामुळे मेहकर मतदारसंघात विकासाची गती कायम राहणार आहे. शिंदे साहेबांमुळेच मेहकर विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्रातील सर्वाधिक ११७ तलाठी कार्यालयांची कामे पूर्ण झाल्याचे सांगत त्यांनी मतदारसंघातील जनतेने दिलेल्या प्रेम आणि विश्वासामुळेच विकासाची अनेक कामे करता आली, अशी भावना व्यक्त केली. भविष्यातही उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून लोणार शहर व संपूर्ण मतदारसंघासाठी मोठ्या प्रमाणात विकासनिधी आणण्याचा प्रयत्न सुरू राहील, असे आश्वासन त्यांनी दिले.कार्यक्रमास वीरशैव लिंगायत समाजाचे अध्यक्ष मंगेश शेटेसर, विश्वनाथकाका जितकर, माजी नगरसेवक डॉ. डुकळे, अच्युत अप्पा बेंद्रे, संजय अप्पा खडक्कर, कमलेश शेटे, अशोक अप्पा खडक्कर, ओकारअप्पा खूपसे, रमेशअप्पा भुक्कन, रविभाऊ भोजपत्रे,  यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मंगेश शेटे सर यांनी केले

१) रमेशअप्पा केळकर यांच्या जागादानातून साकारले समाजाचे स्वप्न; सभागृहाचे लोकार्पण संपन्न

वीरशैव लिंगायत समाजाकडून अनेक वर्षांपासून लोणार येथे सामाजिक सभागृहाची मागणी होत होती. मात्र जागेअभावी कामाला विलंब झाला. समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते रमेशअप्पा केळकर यांनी कोणताही मोबदला न घेता सभागृहासाठी स्वतःच्या मालकीची जागा उपलब्ध करून दिली. त्यांच्या या उदात्त योगदानामुळे समाजासाठी भव्य सभागृह साकार होऊ शकले, ही आनंदाची बाब असल्याचे मा. आ रायमुलकर सांगितले. यावेळी त्यांचा सपत्नीक सत्कार ही करण्यात आला.

२)यावेळी त्यांनी लोणार येथील श्रीमद जगद्गुरू पलसिद्ध धर्मपीठ (र. नं. A-289) या मठाला तिर्थस्थळाचा 'क' वर्ग दर्जा मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर तात्काळ पाठपुरावा करण्याचे आश्वासनही दिले.दरम्यान त्यांनी शिवसेनेचे ज्येष्ठ मार्गदर्शक स्वर्गीय गणपत अप्पा खडक्कर यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करत, "ते शेवटपर्यंत निष्ठावान शिवसैनिक राहिले. त्यांचे मार्गदर्शन कायम प्रेरणादायी राहिले," अशा शब्दांत त्यांना आदरांजली वाहिली.
बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७ ——— बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७

Post a Comment

0 Comments