शहरात आषाढी एकादशीचा सण अत्यंत भक्तिमय आणि उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. विविध धार्मिक व शैक्षणिक संस्थांच्या वतीने वारी, दिंडी आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
स्थानिक महेश इंटरनॅशनल स्कूल मध्ये विठ्ठल नामाच्या वारीचे आणि बाळगोपालांच्या दिंडीचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्याला संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुभाष लोहिया, सीतारामजी ठोकळ, विजय पवार, आकाश सास्ते, डॉ. हार्दिक लोहिया, प्राचार्य ज्योती मंत्री व उपप्राचार्य काशिनाथ गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. विद्यार्थ्यांच्या ढोल पथक, लेझिम, पावली आणि भक्तीनृत्याने मेहकरकरांची मने जिंकली.
दुसरीकडे, सद्गुरू नगर व विठाई नगर येथील संत गजानन महाराज मंदिरात शोभा कुंज सेवाभावी ट्रस्टच्या वतीने विठ्ठल-रुक्मिणीची पूजा, सकाळी ११ वाजता महाआरती आणि त्यानंतर महाप्रसादाचे (उसळ, केळी, राजगिरा लाडू) वाटप करण्यात आले. या प्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष रवी शेठ अग्रवाल, मधू ताई अग्रवाल, कैलास भाऊ चनखोरे, विठ्ठल शेठ अग्रवाल, राजू भाऊ हेडा, किशोर भाऊ रहाटे, डॉ. अभिजित खिल्लारी पाटील, पत्रकार निलेश (मुन्ना) काळे यांच्यासह अनेक मान्यवर व महिला सेवाधारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


0 Comments