अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिर उभारणीसाठी देशभरातील कोट्यवधी रामभक्तांनी श्रद्धेने दिलेल्या देणगीत अपहार झाल्याचा आरोप करत, या प्रकरणातील दोषींवर तातडीने गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी आज (१३ जुलै) लोणार येथे काँग्रेसच्या वतीने 'रघुपती राघव राजाराम' सत्याग्रह करण्यात आला. शहरातील गजानन महाराज मंदिरात टाळ, मृदंग आणि वीणा वाजवून काँग्रेस कार्यकर्त्यांनी सरकारचे लक्ष वेधले.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी हर्षवर्धन दादा सपकाळ आणि बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश अवचार पाटील यांच्या निर्देशानुसार, लोणार तालुका काँग्रेस आणि शहर काँग्रेस कमिटीने या आंदोलनाची हाक दिली होती. सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आलेल्या या सत्याग्रहाने संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेतले.
"राम आमच्या मनात आणि संविधानात"
प्रभू श्रीराम हे मर्यादा, न्याय, सत्य आणि संविधानिक मूल्यांचे प्रतीक आहेत. त्यामुळे त्यांच्या नावाने गोळा केलेल्या देणगीत १०० टक्के पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि जनतेसमोर संपूर्ण हिशोब असलाच पाहिजे, अशी ठाम भूमिका यावेळी काँग्रेस नेत्यांनी मांडली. "महात्मा गांधींच्या सत्याग्रहाच्या मार्गाने, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या समतेच्या विचारांनी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वाभिमानाच्या प्रेरणेने हा सत्याचा आग्रह आम्ही देशभरात पोहोचवू," असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
ठाणेदारांना निवेदन आणि कारवाईची मागणी
गजानन महाराज मंदिरात भजन आणि टाळ-मृदंगाच्या गजरात आंदोलन केल्यानंतर, काँग्रेसच्या शिष्टमंडळाने लोणार पोलीस स्टेशन गाठले. तेथे ठाणेदारांना एक सविस्तर निवेदन देण्यात आले असून, रामभक्तांच्या श्रद्धेशी खेळणाऱ्या आणि देणगीत अपहार करणाऱ्या गुन्हेगारांवर तत्काळ गुन्हे दाखल करण्याची आक्रमक मागणी करण्यात आली आहे.
यांची होती प्रमुख उपस्थिती:
लोणार तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अश्रुजी फुके आणि शहर अध्यक्ष शेख समद शेख अहमद यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या सत्याग्रहात अनेक मान्यवर व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
प्रमुख नेते: माजी नगराध्यक्ष भूषण पाटील, उपनगराध्यक्ष आबेद खान, गटनेते नितीन शिंदे, बांधकाम सभापती अनिकेत मापारी.
विद्यमान व माजी नगरसेवक: पंढरी भाऊ चाटे, श्याम राऊत, गुलाब सरदार, साहेबराव पवार, जमील कुरेशी, शेख रऊफ भाई, अंबादास इंगळे.
पदाधिकारी व कार्यकर्ते: गोपी आखाडे, शहर उपाध्यक्ष गजानन मापारी, युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष अमोल सोनुने, एजाज खान, विकास मोरे, भवानी मापारी, तानाजी मापारी, आप्पा शिंदे.
या लक्षवेधी आंदोलनात काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक आणि रामभक्त सहभागी झाले होते. या आंदोलनामुळे श्रीराम मंदिर देणगीचा मुद्दा लोणारमध्ये चांगलाच चर्चेत आला आहे.

0 Comments