SP निलेश तांबेंवर फेसबुकवर 'ती' कमेंट करणं पडलं महागात! तामगाव पोलिसांचा थरारक दणका; थेट गुन्हा दाखल!

बुलढाणा (गावकरी टाइम्स/प्रतिनिधी):
सोशल मीडियाचा गैरवापर करून कायदा आणि सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्यांना पोलिसांनी आता कडक इशारा दिला आहे. बुलढाणा जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक (SP) निलेश तांबे यांच्याबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह आणि अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टिप्पणी करणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला आहे. या प्रकरणी तामगाव पोलिसांनी तातडीने कारवाई करत संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.


नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, ३ जून २०२६ रोजी संध्याकाळी तामगाव पोलीस स्टेशनमधील गोपनीय विभागाचे कर्मचारी मनिष त्र्यंबक वानखडे हे आपले कार्यालयीन काम पाहत होते. त्याच वेळी सोशल मीडिया मॉनिटरिंग दरम्यान त्यांना 'ट्रिपल व्ही बकाल' नावाच्या फेसबुक अकाउंटवरून करण्यात आलेली एक अत्यंत आक्षेपार्ह पोस्ट दिसून आली. या पोस्टमध्ये पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्याबद्दल बदनामीकारक आणि अश्लील मजकूर लिहिण्यात आला होता.

'या' तरुणावर गुन्हा दाखल!

पोलीस प्रमुखांबद्दल अशा पद्धतीची आक्षेपार्ह पोस्ट पाहताच कर्मचाऱ्यांनी याची माहिती तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. ठाणेदारांनी या गंभीर प्रकरणाची स्वतः खात्री केली आणि कायदेशीर कारवाईचे आदेश दिले. या प्रकरणी विशाल विनायक बकाल (रा. वरवट बकाल, ता. संग्रामपूर) या तरुणाविरुद्ध तामगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम २९६ आणि ३५६(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विलास ज्ञानेश्वर बोपते यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

पोलीस प्रशासनाचा इशारा:

पोलिसांच्या मते, जिल्ह्याच्या सर्वोच्च पोलीस अधिकाऱ्याविषयी अशी विधाने करणे म्हणजे केवळ एका व्यक्तीची नव्हे, तर संपूर्ण पोलीस दलाची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न आहे. 'अभिव्यक्ती स्वातंत्र्या'च्या नावाखाली सोशल मीडियावर बेफाम लिहिणाऱ्यांसाठी ही कारवाई म्हणजे मोठा इशारा आहे. कायद्याचा अवमान करणाऱ्यांवर यापुढेही अशीच कडक कारवाई केली जाईल, हे यावरून स्पष्ट होते.
बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७ ——— बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७

Post a Comment

0 Comments