ऑनलाईन औषध विक्रीविरोधात २० मे रोजी 'भारत बंद'; लोणार तहसीलदार व पोलीस प्रशासनाला निवेदन


लोणार (गावकरी टाईम्स/प्रतिनिधी)
: केंद्र सरकारच्या धोरणांमुळे इंटरनेट फार्मसी, ई-पोर्टल आणि ऑनलाईन औषध विक्रीचा व्यवसाय फोफावत चालला असून, याचा मोठा फटका स्थानिक औषध विक्रेत्यांना बसत आहे. याच्या निषेधार्थ 'अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटना' (AIOCD) यांनी येत्या बुधवार, २० मे २०२६ रोजी देशव्यापी बंद पुकारला आहे. या पार्श्वभूमीवर, 'लोणार तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन'च्या वतीने आज लोणारचे तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले.

 

काय आहेत मागण्या?

देशात आणि राज्यात बेकायदेशीर रित्या सुरू असलेली इंटरनेट फार्मसी, ऑनलाईन औषध विक्री आणि ई-पोर्टल प्रणाली तत्काळ बंद करण्यात यावी, अशी प्रमुख मागणी औषध विक्रेत्यांची आहे. या संदर्भात यापूर्वी केंद्र सरकारला वारंवार निवेदने देऊनही कोणतीही सकारात्मक भूमिका न घेतल्याने संघटनेने आता आक्रमक पवित्रा घेत हा बंद पुकारला आहे.

लोणार तालुक्यातील विक्रेत्यांचा पूर्ण पाठिंबा

या आंदोलनात महाराष्ट्र राज्यासह बुलढाणा जिल्हा आणि लोणार तालुक्यातील सर्व औषध विक्रेते सहभागी होऊन आपली दुकाने कडकडीत बंद ठेवणार आहेत.

रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी हेल्पलाइन

बंद काळात रुग्णांना औषधांची तातडीची गरज भासल्यास त्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी संघटनेने विशेष काळजी घेतली आहे. अत्यावश्यक सेवेसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे:

अफसर भाई: ९७३०७७२५५५
चंदन दरोगा: ९३७३९९४२०१
रिजवान जड्डा: ८८५५८३८५५५
शितल बोरा: ९४२२२५१२३४
पंजाब शिंदे: ९७६६३१५७७७
संतोष सानप: ९८५०३५६५७४

यावेळी संघटनेचे अध्यक्ष सुमितजी बोरा, सचिव संतोष सानप, उपाध्यक्ष रिजवान जड्डा शेठ, कोषाध्यक्ष पंजाब शिंदे व इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते. प्रशासनाने औषध विक्रेत्यांच्या भावना शासनापर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन दिले आहे.





सुविधा मेडिकल अँड जनरल स्टोअर, सुलतानपूर

सर्व प्रकारच्या औषधी व जनरल वस्तू मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण.

संपर्क: 9860494807

बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७ ——— बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७

Post a Comment

0 Comments