रिसोड (गावकरी टाइम्स/प्रतिनिधी): वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील श्री शिवाजी हायस्कूल, गोभणी या शाळेने आपल्या यशाची परंपरा यंदाही कायम राखली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या इयत्ता १० वीच्या परीक्षेत विद्यालयाचा निकाल ९४.५६% लागला असून, विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
यंदाच्या निकालात मुलींनी बाजी मारली असून आलिया आसिफ खान हिने ८७.६०% गुण मिळवून विद्यालयात प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. तसेच अर्शिया शेख रसूल ८६.६०% गुणांसह द्वितीय, तर अनुजा पांडुरंग मोरे ८६.४०% गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे.
गुणवंत विद्यार्थ्यांची नामावली:
विशेष प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या इतर विद्यार्थ्यांमध्ये:
जागृती सुरेश अंभोरे: ८५.२०%
समृद्धी सुरेश केनवडकर: ८४.८०%
अक्षद अमोल गारडे: ८४.६०%
पुनम महेंद्र साबळे: ८२.००%
किरण मोहन साबळे: ८१.२०%
या यशस्वी विद्यार्थ्यांचे श्री शिवाजी शिक्षण संस्था केनवडचे अध्यक्ष माननीय आमदार अमितभाऊ झनक, सचिव, तसेच सर्व संचालक मंडळाने कौतुक केले आहे. विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सर्व गुणवंतांचे अभिनंदन करून त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
विद्यार्थ्यांच्या या यशात त्यांच्या कठोर मेहनतीसोबतच शिक्षकांचे चोख मार्गदर्शन आणि पालकांचे मोलाचे सहकार्य लाभल्याची भावना परिसरात व्यक्त होत आहे.

0 Comments