संस्थेच्या अध्यक्षांच्या हस्ते भट्टी पूजन
या विशेष औषध निर्माण प्रक्रियेसाठी उभारण्यात आलेल्या भट्टीचे उद्घाटन व पूजन संस्थेचे अध्यक्ष मा. संजूभाऊ लाहोटी आणि सचिव मा. सोमेशभाऊ लाहोटी यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले. यावेळी त्यांनी या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे कौतुक केले आणि विभागाच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
तज्ज्ञांचे मार्गदर्शन व सहभाग
ही संपूर्ण औषध निर्मिती प्रक्रिया महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विहार बिडवई सर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. रस शास्त्र विभागातील तज्ज्ञ डॉक्टर:
डॉ. स्वप्निल मुंढे,डॉ. आशिष काळे,डॉ. निलेश निकम यांनी शास्त्रोक्त पद्धतीने या औषधांची निर्मिती केली.
काय आहे 'लघुपुट' विधी?
आयुर्वेदामध्ये औषधांची मारक क्षमता आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी 'पुट' पद्धतीचा वापर केला जातो. यामध्ये 'लघुपुट' हा एक सूक्ष्म व प्रभावी विधी असून, याद्वारे बनवलेले 'अर्क लवण' आणि 'नारिकेल लवण' पोटाच्या विकारांवर अत्यंत गुणकारी मानले जातात.
या यशस्वी प्रयोगामुळे डॉ. आर. एन. लाहोटी आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अनुभवातही मोलाची भर पडली आहे.

0 Comments