सोनाळा येथील युवा कृषी उद्योजक अजिंक्य तिडके यांना राज्यस्तरीय राजीव गांधी कृषीरत्न पुरस्कार प्रदान

संग्रामपूर(गावकरी टाइम्स/पवन ठाकरे):तालुक्यातील सोनाळा येथील युवा उद्योजक तथा सदन कास्तकार श्री अजिंक्य तिडके यांना अत्यंत मानाचा व प्रतिष्ठेचा सन 2026 चा राज्यस्तरीय राजीव गांधी कृषीरत्न पुरस्कार”शेतकऱ्यांच्या उपस्थितीत त्यांच्या शेतीच्या बांधावर प्रदान करण्यात आला.राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठान, अमरावती यांच्या वतीने दरवर्षी महाराष्ट्रातील नाविन्यपूर्ण शेती करणारे तसेच शेतीशी संबंधित उद्योग-व्यवसाय उभारणाऱ्या प्रगतशील शेतकऱ्यांचा भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त सन्मान केला जातो.यावर्षी हा मान सोनाळा येथील युवा कृषी उद्योजक अजिंक्य तिडके यांना मिळाल्याने परिसरात आनंदाचे वातावरण आहे


यावेळी बोलताना प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री प्रकाश साबळे यांनी सांगितले की 
"अजिंक्य तिडके यांनी आधुनिक शेतीसोबत शेतीपूरक उद्योग उभारून युवकांसमोर आदर्श निर्माण केला आहे. त्यांचे कार्य प्रेरणादायी असून त्यांच्या सन्मानामुळे इतर युवकांनाही शेतीकडे आकर्षित होण्याची प्रेरणा मिळेल".

कार्यक्रमात श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावतीचे उपाध्यक्ष श्री केशवराव मेतकर यांनी शेतकऱ्यांनी जैविक तंत्रज्ञान व आधुनिक शेती पद्धतीकडे वळण्याची गरज व्यक्त केली.तसेच जिजामाता कृषिभूषण पुरस्कार प्राप्त महिला शेतकरी ग्रामगीताचार्य सौ. पौर्णिमा ताई सवाई यांनी युवकांनी शेतीसोबत शेतीपूरक व्यवसायाला अधिक प्राधान्य द्यावे असे मनोगत व्यक्त केले.सदर कार्यक्रम अजिंक्य तिडके यांच्या शेती व शेतीशी संबंधित उद्योगाच्या ठिकाणी संपन्न झाला. 

कार्यक्रमास मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित 

यावेळी विश्वनाथ तिडके, श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीचे उपाध्यक्ष श्री केशवराव मेतकर, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे अभ्यास मंडळ प्रमुख डॉ. दिलीप काळे, गुलाबराव महाले, प्रगतशील शेतकरी डॉ. मुकेश कापरे, प्रतिष्ठानचे ऐनल्ला खान, अजीज खान आदी मान्यवर उपस्थित होते. केंद्रीय मंत्री Nitin Gadkari यांच्या समवेत असणाऱ्या शेतकरी प्रतिनिधी मंडळासोबत अजिंक्य तिडके यांनी स्पेन व युरोप देशांचा कृषी अभ्यास दौरा केला आहे.त्यानंतर त्यांनी सोनाळा परिसरात कृषी उद्योगाला चालना देत रोजगार निर्मितीचे नवे दालन खुले केले.तसेच JST Fruits च्या माध्यमातून संत्रा व्यापार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून त्यांनी कृषी व्यवसायात नवे पर्व सुरू केले आहे.त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे
बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७ ——— बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७

Post a Comment

0 Comments