सुलतानपूर (गावकरी टाइम्स/प्रतिनिधी): लोणार तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या सुलतानपूरचे लोकप्रिय उपसरपंच आणि नागवंशी सामाजिक संघटनेचे सर्वेसर्वा नागवंशी संघपाल भाऊ पनाड यांचा वाढदिवस कुठलाही डामडौल किंवा गाजावाजा न करता, अत्यंत साधेपणाने आणि सामाजिक बांधिलकी जपत विविध लोकहितवादी उपक्रमांनी साजरा करण्यात आला. या निमित्ताने गरजू रुग्ण आणि गरीब कुटुंबांना मदत करून उपसरपंचांनी समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे.
रुग्णालयात फळवाटप आणि वैद्यकीय अधिकार्यांकडून शुभेच्छा
वाढदिवसाचे औचित्य साधून सकाळी ठीक १०:०० वाजता सुलतानपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात (सरकारी दवाखाना) दाखल असलेल्या रुग्णांना केळी, सफरचंद, चिकू अशा विविध फळांचे वाटप करण्यात आले. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. निखिल पिसे, डॉ. बायस साहेब, डॉ. शेळके साहेब, डॉ. जायभाये, पूजा गवई आणि कुटे मॅडम प्रामुख्याने उपस्थित होते. वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उपसरपंच संघपाल पनाड यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक करत त्यांना निरोगी आयुष्याच्या भरभरून शुभेच्छा दिल्या.
पारधी वस्तीत मदतीचा हात
यानंतर उपसरपंच पनाड यांच्या वतीने स्थानिक पारधी वस्तीमध्ये जाऊन वंचित व गरीब कुटुंबांना थेट मदत करण्यात आली. वस्तीतील महिलांना साड्या, तर पुरुषांना रुमाल आणि टोपीचे वाटप करण्यात आले. तसेच तेथील नागरिकांना फळवाटपही करण्यात आले. या संवेदनशील उपक्रमामुळे वस्तीतील नागरिकांनी पनाड यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.
सकाळी ११:०० वाजता ग्रामपंचायत कार्यालय, सुलतानपूर येथे एक भव्य नागरी सत्कार सोहळा पार पडला. यावेळी ग्रामसेवक नंदकिशोर तेजनकर व ग्रामपंचायत सदस्यांच्या वतीने उपसरपंच संघपाल पनाड यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन भावपूर्ण सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन भिकाजी भानापुरे यांनी केले.
एम.आय.एम. (AIMIM) पक्षाच्या वतीने सत्कार व शुभेच्छा
उपसरपंच संघपाल पनाड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून एम.आय.एम. (AIMIM) सुलतानपूर शहराच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. एम.आय.एम. चे शहर अध्यक्ष असीम खान आणि पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी उपसरपंच पनाड यांना शाल, पुष्पगुच्छ आणि पेढे भरवून वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या. यावेळी शहराध्यक्ष असीम खान यांच्यासह मुकद्दर खान पठाण, शेख फैसल, शेख आबिद आदि मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मान्यवरांची लक्षणीय उपस्थिती
या संपूर्ण सामाजिक व सत्कार उपक्रमाला युवा नेते अनित्य घेवंदे, आमिर भाई, शेख सद्दाम भाई, आसिम खान, अन्सार शाह, प्रसंजीत पनाड, बिंबिसार पनाड, दामू सुरूशे, दामोदर सुरोशे, मधु खेत्रे, शरद पवार सर, संतोष शिंदे, संतोष पाटील, फयाज मिस्त्री, दिलीप मसुरे, शेख शेख आसद भाई, तौफिक शाह आणि 'स्टार ग्रुप'चे सर्व सदस्य, ग्रामपंचायतीचे कर्मचारी व गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणताही बडेजाव न करता थेट जनतेच्या दारात जाऊन राबवलेल्या या स्तुत्य उपक्रमांमुळे उपसरपंच संघपाल पनाड यांच्या वाढदिवसाची चर्चा संपूर्ण लोणार तालुक्यात कौतुकाचा विषय ठरली आहे.



0 Comments