महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (MSBSHSE) १२ वीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा आता संपली आहे. २०२६ सालातील इयत्ता १२ वीचा (HSC) निकाल उद्या शनिवार, २ मे २०२६ रोजी दुपारी १:०० वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात येणार आहे.
यावर्षी राजभरातून तब्बल १५ लाख ३२ हजार ४८७ विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. परीक्षेचा निकाल बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळांवर प्रसिद्ध केला जाईल.
निकाल पाहण्यासाठी अधिकृत वेबसाईट:
विद्यार्थी आपला निकाल खालीलपैकी कोणत्याही लिंकवर पाहू शकतात:
mahresult.nic.in
hscresult.mkcl.org
mahahsscboard.in
असा पहा तुमचा निकाल:
१. सर्वप्रथम वरीलपैकी कोणत्याही अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
२. 'HSC Examination Result 2026' या लिंकवर क्लिक करा.
३. तुमचा रोल नंबर (Seat Number) आणि आईचे नाव अचूक भरा.
४. 'View Result' बटणावर क्लिक करताच तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
५. भविष्यातील संदर्भासाठी निकालाची प्रिंटआउट किंवा स्क्रीनशॉट काढून ठेवावा.
उद्या दुपारी १ वाजता लिंक सक्रीय होणार असून, सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आगाऊ अभिनंदन!

0 Comments