बुलडाणा जिल्ह्यावर शोककळा! उत्तर प्रदेशात भाविकांच्या बसचा भीषण अपघात; २ महिलांचा मृत्यू, ३५ जखमी


 मोताळा/बुलडाणा:

बुलडाणा जिल्ह्यातील भाविकांच्या आनंदाच्या तीर्थयात्रेवर काळाने घाला घातला आहे. उत्तर प्रदेशातील वाराणसी-गोरखपूर महामार्गावर भाविकांच्या एका खाजगी बसला भीषण अपघात झाला असून, या दुर्घटनेत २ महिला भाविकांचा मृत्यू झाला आहे. मृतांपैकी एक महिला बुलडाणा जिल्ह्यातील असून दुसरी अकोला जिल्ह्यातील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या अपघातात बसमधील इतर ३५ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

नेमकी घटना काय?

बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील सुमारे ४४ भाविक एका खाजगी बसने उत्तर प्रदेशात तीर्थयात्रेसाठी गेले होते. गुरुवारी ही बस वाराणसी-गोरखपूर महामार्गावरून जात असताना, गाझीपूर शहराजवळ चालकाचे नियंत्रण सुटले. असे सांगितले जात आहे की, रस्त्यावरील एक गाय (कारला) वाचवण्याच्या प्रयत्नात बस वेगाने दुभाजक आणि रेलिंगला धडकून उलटली.

मृतांची ओळख आणि जखमींची अवस्था

या हृदयद्रावक घटनेत दोन ज्येष्ठ महिलांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये बुलडाणा आणि अकोला जिल्ह्यातील महिलांचा समावेश असल्याने संपूर्ण वऱ्हाड प्रांतात हळहळ व्यक्त केली जात आहे. अपघातातील ३५ जखमींना तातडीने गाझीपूर येथील सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

प्रशासनाकडून मदतकार्य

घटनेची माहिती मिळताच उत्तर प्रदेश पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य राबवले. सध्या स्थानिक प्रशासन आणि पोलीस बुलडाण्यातील भाविकांच्या नातेवाईकांशी संपर्क साधत आहेत. या घटनेमुळे मोताळा तालुक्यासह संपूर्ण बुलडाणा जिल्ह्यावर शोककळा पसरली असून, जखमींना योग्य उपचार मिळण्यासाठी प्रयत्न केले जा

त आहेत.

Post a Comment

0 Comments