"शासनाचे पाऊल जनतेच्या दारात! आमदार सिद्धार्थ खरात यांच्या उपस्थितीत 'महाराजस्व शिबिरा'चा सुलतानपुरात धडाका."

 


सुलतानपूर (गावकरी टाइम्स/प्रतिनिधी):

"जनतेच्या सेवेसाठी शासन आणि शासनाच्या केंद्रस्थानी जनतेचा विश्वास" हा विचार सार्थ ठरवत, सुलतानपूर येथे आयोजित 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर' अत्यंत उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाला आमदार सिद्धार्थ खरात यांनी विशेष उपस्थिती लावून नागरिकांशी संवाद साधला.


'ग्रामगीता' देऊन महसूल अधिकाऱ्यांचा सन्मान

कार्यक्रमाचे एक मुख्य आकर्षण म्हणजे श्री शिवाजी हायस्कूलच चे मुख्याध्यापक सुनील सोळंके व शिक्षकवृंदाने जपलेली सामाजिक कृतज्ञता. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी थेट जनतेच्या दारात येऊन समस्या सोडवल्याबद्दल, शिक्षकवृंदाच्या वतीने सर्व मान्यवर अधिकाऱ्यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज लिखित 'ग्रामगीता' हा ग्रंथ भेट देऊन सन्मानित करण्यात आले. गावच्या विकासासाठी प्रशासकीय सेवा आणि आध्यात्मिक विचारांची सांगड घालणारा हा उपक्रम सर्वांच्या कौतुकाचा विषय ठरला.


विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने कार्यक्रमाची रंगत वाढली

शिबिराच्या सुरुवातीला श्री शिवाजी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी ढोल-ताशांच्या गजरात दमदार लेझीम पथक सादर केले. तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांतून विद्यार्थ्यांनी उपस्थितांचे मनोरंजन केले. विद्यार्थ्यांच्या या उस्फूर्त सहभागामुळे शिबिराच्या ठिकाणी आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.

एकाच छताखाली विविध सेवांचा लाभ

हे शिबीर म्हणजे "तक्रारीपासून समाधानाकडे जाणारा थेट मार्ग" ठरले. यामध्ये १६ हून अधिक सेवा पुरवण्यात आल्या:

फेरफार अदालत व सातबारा दुरुस्ती.

जात, रहिवासी व नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्र वाटप.

पीएम किसान ई-केवायसी आणि नवीन रेशन कार्ड सुविधा.

संजय गांधी निराधार योजना व लाडकी बहीण योजना केवायसी.


मान्यवरांची उपस्थिती आणि मार्गदर्शन

याप्रसंगी व्यासपीठावर आमदार सिद्धार्थ खरात यांच्यासह उपविभागीय अधिकारी श्री. रवींद्र जोगी, तहसीलदार श्री. भूषण पाटील, नायब तहसीलदार श्रीमती योगेश्वरी परळीकर, मंडळ अधिकारी श्री. संतोष पनाड, डॉ. हेमराज लाहोटी, आशाताई झोरे, संघपाल पनाड, विदर्भकन्या शाईन पटेल, बाळू पनाड, शेख अजहर, शेख खाजा, जाकीर खान, बंडू जोगदंड, मारोतराव सुरुशे, सदानंद पाटील उपस्थित होते. 

तसेच ग्राम महसूल अधिकारी बि. एस. पवार, एस. एस. देव्हडे, आर व्हि भाकडे, के. ए. फोलाने, पि.पी बोडखे आणि गजानन टकले यांनी शिबीर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

तहसीलदार भूषण पाटील यांनी प्रास्ताविक केले, तर उपविभागीय अधिकारी रवींद्र जोगी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर पनाड आणि दंदाले मॅडम यांनी केले. "सेवेचा हा दीप असाच प्रज्वलित राहो" या काव्यमय ओळींनी कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. प्रशासकीय यंत्रणा आपल्या दारात आल्याने सुलतानपूर मंडळातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Post a Comment

0 Comments