क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य (पुणे) यांच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय ज्ञानपीठ शाळेची विद्यार्थिनी कु. मन्ना सत्तार शेख हिने बुद्धिबळ स्पर्धेत अप्रतिम बुद्धिमत्ता व चातुर्याचे प्रदर्शन करत घवघवीत यश संपादन केले आहे. तिच्या या दमदार कामगिरीच्या जोरावर तिची जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली असून, तिच्या या यशाने शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
तालुक्यातील विविध शाळांमधून शेकडो स्पर्धकांनी सहभाग घेतलेल्या या चुरशीच्या स्पर्धेत मन्ना शेख हिने पटावर अचूक चाली रचत प्रतिस्पर्ध्यांना निष्प्रभ केले. शांत वृत्ती, दूरदृष्टी आणि एकाग्रतेच्या बळावर तिने मिळवलेल्या या यशाचे संपूर्ण मेहकर तालुक्यातून भरभरून कौतुक होत आहे.
भारतीय ज्ञानपीठ शाळा केवळ शैक्षणिक गुणवत्तेतच नव्हे, तर क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातही सातत्याने अव्वल स्थान टिकवून आहे. संस्थेचे अध्यक्ष ललितजी इन्नानी, उपाध्यक्ष रविसेठ अग्रवाल आणि सचिव विशालजी काबरा यांच्या प्रेरणादायी नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना नेहमीच व्यासपीठ दिले जाते.
मन्ना शेख हिच्या या देदीप्यमान यशाबद्दल मुख्याध्यापक मेहबूब परसुवाले, के. एम. गारोळे यांच्यासह क्रीडा शिक्षक माधव अवचार, भारत कटारे, योगेश दाभाडे तसेच शिक्षक अमोल मानवतकर, मुकेश लाड, शेख इरफान, राहुल मोरे, अनंत ठाकरे आणि शिक्षिका अल्का निंबेकर, दैविक ताकतोडे, मीना अवचार, तेजस्विनी विटकरे, पायल खबाले, शारदा सिंतल, आशा खेरोडकर, अर्चना काकडे, रुपाली पेटकर, अर्चना शेळके, जयश्री शिंगणे, नलिनी क्षीरसागर, मंदा सारसकर, परविन शेख, श्वेता जाधव, सुजाता भालेराव, जुही राऊत, फिरदोस शेख, प्रज्ञा अवसरमोल, आशा गोरे व शुमायला शेख यांनी तिचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.
शिक्षकांचे दर्जेदार मार्गदर्शन आणि व्यवस्थापनाच्या खंबीर पाठबळामुळे भारतीय ज्ञानपीठचे विद्यार्थी प्रत्येक क्षेत्रात चमकत आहेत. मन्ना शेख हिच्या या यशामुळे शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, तिच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. आगामी जिल्हास्तरीय स्पर्धेतही ती अशीच दैदिप्यमान कामगिरी करेल, असा विश्वास शाळेच्या वतीने व्यक्त करण्यात आला.

0 Comments