येथील शिवकृपा लॅबमध्ये सुलतानपूर परिसरातील प्रयोगशाळा तंत्रज्ञांची (लॅब टेक्निशियन) महत्त्वपूर्ण सभा अत्यंत उत्साही व शिस्तबद्ध वातावरणात पार पडली. या बैठकीत वाढती महागाई, तंत्रज्ञांना कार्यस्थळी भेडसावणाऱ्या विविध अडचणी आणि त्यांच्या न्याय्य हक्कांवर सविस्तर चर्चा होऊन संघटनेची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. संघटनेच्या अध्यक्षपदी दिलीप भिकाजी सुरुशे यांची सर्वानुमते निवड झाली आहे.
सभेस प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले ज्येष्ठ तंत्रज्ञ रामेश्वर महादू कडूकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना, आरोग्य सेवेचा कणा असलेल्या लॅब टेक्निशियन्सनी आपल्या हक्कांच्या संरक्षणासाठी व व्यावसायिक अडचणींवर मात करण्यासाठी संघटित राहणे काळाची गरज असल्याचे अधोरेखित केले.
नूतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे:
अध्यक्ष: दिलीप भिकाजी सुरुशे
उपाध्यक्ष: गणेश समाधान पिसे
सचिव: दत्ता जागृत
कोषाध्यक्ष: परमेश्वर आंबादास सोनुने
मार्गदर्शक: रामेश्वर महादू कडूकर
कार्यकारिणी सदस्य: कृष्णा जुमडे, उमाकांत शेलके, वैभव गायकवाड, विवेक चव्हाण, वैभव शिंदे
नवनिर्वाचित अध्यक्ष दिलीप सुरुशे यांनी आपल्या मनोगतात सर्व सहकाऱ्यांचे आभार मानत, तंत्रज्ञ बांधवांच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी आणि संघटनेच्या माध्यमातून एकजूट अधिक बळकट करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त केला.
या बैठकीस परिसरातील लॅब टेक्निशियन मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांचे आभार मानून सभेची सांगता करण्यात आली.

0 Comments