साखरखेर्डा येथे ईद-ए-मिलादुन्नबीच्या पवित्र पर्वानिमित्त खिदमते खल्क फाउंडेशनच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात तब्बल १४० रक्तदात्यांनी रक्तदान करून मानवतेचा आणि सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी संदेश दिला.या रक्तदान शिबिराला हिंदू-मुस्लिम बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सामाजिक एकतेचा आणि मानवतेचा प्रेरणादायी संदेश दिला.
ईद-ए-मिलादुन्नबीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमातून जात-धर्माच्या पलीकडे जाऊन ‘रक्तदान हेच श्रेष्ठ दान’ या भावनेचा प्रत्यय आला. रक्ताची गरज असलेल्या रुग्णांसाठी मदतीचा हात पुढे करत अनेकांनी स्वेच्छेने रक्तदान केले. त्यामुळे या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
या रक्तदान शिबिराच्या आयोजनासाठी शेख राजिक शेख कय्यूम, अब्दुल रशीद गुलाम दस्तगीर, समीउल हक, शेख राजिक शेख क़मर, आबिद खान ख्वाजा खान पठाण, सिकंदर खान सत्तार खान, अजीम मुनीर कुरेशी, इशरत अली मोहम्मद अली, शेख वसीम शेख करीम आणि शेख जाकिर शेख रशीद यांच्यासह खिदमते खल्क फाउंडेशनच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.
रक्तदान करणाऱ्या १४० रक्तदात्यांचे आयोजकांच्या वतीने आभार मानण्यात आले.
या सामाजिक उपक्रमातून साखरखेर्डा परिसरातील हिंदू-मुस्लिम ऐक्य, बंधुभाव आणि मानवतेची भावना अधिक दृढ झाली. धार्मिक सण केवळ उत्सवापुरते मर्यादित न ठेवता समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून साजरे करण्याचा आदर्श या शिबिराने निर्माण केला.
रक्तदान शिबिराला मिळालेला प्रतिसाद पाहता नागरिकांनी आयोजकांचे अभिनंदन करत, अशा समाजोपयोगी उपक्रमांचे सातत्याने आयोजन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. खिदमते खल्क फाउंडेशनच्या या उपक्रमाची साखरखेर्डा परिसरात सर्वत्र प्रशंसा होत आहे.


0 Comments