देऊळगाव साखरशा परिसरात बेकायदेशीरपणे चालणाऱ्या गोवंश हत्या प्रकरणाचा पोलिसांनी पहाटेच्या अंधारात धडाकेबाज पर्दाफाश केला आहे. पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक (सपोनि) शरद माळी आणि त्यांच्या पथकाने रचलेल्या सापळ्यात दोन आरोपी जाळ्यात अडकले असून, त्यांच्याकडून तब्बल १ क्विंटल २६ किलो गोमांस आणि कत्तलीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
पहाटे ४:३० ची थरारक कारवाई!
मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आज (३० जुलै २०२६) पहाटे ४:३० वाजेच्या सुमारास पोलिसांनी देऊळगाव साखरशा येथील संशयित ठिकाणावर अचानक धाड टाकली. पोलिसांचा हा ताफा धडकताच आरोपींची भंबेरी उडाली.
घटनास्थळावरून पोलिसांनी शेख अफसर शेख वाहब आणि शेख रिजवान शेख गफार या दोन्ही आरोपींना जागेवरच रंगेहात बेड्या ठोकल्या. या संयुक्त कारवाईत कत्तलीसाठी वापरण्यात येणारे घातक हत्यारे, साहित्य आणि मांसासह ₹४३,१५० किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
बीएनएस (BNS) आणि प्राणी संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हे दाखल!
अटकेत असलेल्या दोन्ही आरोपींवर:
भारतीय न्याय संहिता (BNS) मधील गंभीर कलमे
महाराष्ट्र प्राणी संरक्षण (गोवंश हत्या प्रतिबंधक) कायदा
या कायद्यांन्वये कठोर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा पुढील सखोल तपास PSI जाधव करत असून, यामागे आणखी कोणाचे नेटवर्क कार्यरत आहे का, याचाही शोध घेतला जात आहे.
'माळी पथका'चा धडाका!
सपोनि शरद माळी यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या धाडसी कारवाईत:
PSI जाधव
पोहेका काकड, पोहेका पवार
पोशि पाटोळे, अमोल अंभोरे, विशाल धोंडगे, विष्णू निकम
LPC शिवकन्या
या पोलीस कर्मचाऱ्यांनी अत्यंत धाडसाने व नियोजितपणे सहभाग नोंदवला. पोलिसांच्या या धडाकेबाज कामगिरीमुळे कायदा व सुव्यवस्था मोडणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
"अवैध कत्तलखाने अन् बेकायदेशीर कृत्ये खपवून घेतली जाणार नाहीत! कायदा हातात घेणाऱ्यांवर यापुढेही अशीच कठोर आणि धडाकेबाज कारवाई सुरूच राहील."
— पोलीस प्रशासन

0 Comments