८ वर्षांची यशस्वी वाटचाल! 'सिटी इंडिया न्यूज'चा वर्धापन दिन सोहळा संपन्न

गावकरी टाइम्स/प्रतिनिधी:
बदलत्या काळात वाचनाची सवय कमी होत असली तरी सर्वांगीण ज्ञानासाठी चौफेर वाचन अत्यावश्यक आहे. डिजिटल मीडियाच्या युगात पत्रकारांची जबाबदारी अधिक वाढली असून, वेगवान वृत्तांकनासोबत समाजापर्यंत अचूक आणि जबाबदारीने बातम्या पोहोचविणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार दिनेश दीक्षित यांनी केले.


सावंगी बायपास येथील हॉटेल ग्रँड श्रीपाद येथे रविवारी (२८ जून) सिटी इंडिया न्यूजच्या ८ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित भव्य सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमास सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, सिटी इंडिया न्यूजचे मुख्य संपादक गणेश चौधरी, मेट्रोपोलिस पोस्टचे संपादक मनोज सांगळे, कार्यकारी संपादक संदीप पांचाळ, राज्य कार्याध्यक्ष अमोल पुरी आणि मुख्य उपसंपादक सचिन चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांनी सिटी इंडिया न्यूजने अल्पावधीत उल्लेखनीय प्रगती साधल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. तर वरिष्ठ पत्रकार मनोज सांगळे यांनी पत्रकारितेतील वाढत्या जबाबदाऱ्या अधोरेखित करत, समाजहिताला प्राधान्य देणारी पत्रकारिता करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन सौ. भावना कुडे यांनी केले.

महाराष्ट्रभरातून सिटी इंडिया न्यूजचे प्रतिनिधी या सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये कचरूजी वेळंजकर, विलास चव्हाण, प्रल्हाद लोखंडे, रमेश चव्हाण, कैलास घोडके, पांडुरंग चौधरी, श्रीराम सोनवणे, विकास कापडे, प्रतीक पानसे, भूपेंद्र चौधरी, अतुल चौधरी, वेदांत चौधरी, सलीम शेख, आदित्य पाटील, देवका चौधरी, अलका चौधरी, चारुशीला चौधरी, नेहा पानसे, शीतल चौधरी, गायत्री चौधरी, सुरेखा कापडे आणि श्रुती पाटील यांचा समावेश होता.

याशिवाय आयडेंट विभागातील अतुल ओवाळे तसेच व्हॉइस विभागातील पूजा हीरपूरकर आणि ऐश्वर्या सोनार यांनीही कार्यक्रमात सहभाग नोंदविला.

संपूर्ण महाराष्ट्रातील प्रतिनिधी, पदाधिकारी आणि मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्यात सिटी इंडिया न्यूजच्या आठ वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा गौरव करण्यात आला. पत्रकारितेतील गुणवत्ता, जबाबदारी आणि सामाजिक बांधिलकी अधिक दृढ करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७ ——— बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७

Post a Comment

0 Comments