"पोलीस ॲक्शन मोडवर!जातीय तेढ निर्माण करणाऱ्या 'त्या' गुंडाचा गेम ओव्हर; दोन महिने जिल्ह्याची हवा बंद!"


बुलडाणा(गावकरी टाईम्स/प्रतिनिधी): 
जिल्ह्यातील 'धाड' परिसरात आपल्या दहशतीने आणि जातीय तेढ निर्माण करणाऱ्या कृत्यांनी धुमाकूळ घालणाऱ्या एका कुख्यात गुन्हेगाराला अखेर खाकी वर्दीचा इंगा दाखवण्यात आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या गुन्हेगाराने सर्वसामान्य नागरिकांची झोप उडवली होती, मात्र आता पोलीस प्रशासनाने घेतलेल्या एका मोठ्या निर्णयामुळे संपूर्ण गुन्हेगारी विश्वात खळबळ माजली असून नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

 

नेमकी घटना काय?

आबीद खान अमनउल्ला खान (वय ३२ वर्षे, रा. धाड) असे या गुन्हेगाराचे नाव आहे. या इसवावर धाड पोलीस स्टेशन अंतर्गत अनेक गंभीर स्वरूपाचे जातीय गुन्हे दाखल होते. त्याच्या कृत्यांमुळे परिसरात सातत्याने हिंदू-मुस्लिम तणाव निर्माण होऊन शांतता भंग होत होती. आश्चर्याची बाब म्हणजे, या गुन्हेगाराची दहशत इतकी टोकाची होती की, त्याच्या विरोधात तक्रार देण्यासही कोणी धजावत नव्हते.

पोलीस अधीक्षकांचा 'सर्जिकल स्ट्राईक'

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी तातडीने सूत्रे हलवली. महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम ५६ (१) (अ) (ब) अन्वये या गुन्हेगाराला जिल्ह्यातून हद्दपार करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. पुराव्यांची कडक शहानिशा केल्यानंतर उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी ११ मे २०२६ पासून आबीद खान याला दोन महिन्यांकरिता जिल्हाबदली (हद्दपारी) करण्याचे कडक आदेश दिले आहेत.

गुन्हेगारांचे धाबे दणाणले!

पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप भोस आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई अत्यंत यशस्वीरीत्या पार पाडली.

"शांतता भंग करणाऱ्यांची गय केली जाणार नाही," असा स्पष्ट इशारा या कारवाईतून देण्यात आला आहे. यामुळे आता इतर गुन्हेगारांचेही धाबे दणाणले असून, प्रशासनाच्या या 'खतरनाक' पावलाचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.
आता या गुन्हेगाराला जिल्ह्याच्या सीमा ओलांडून बाहेर जावे लागणार असून, परिसरात पुन्हा एकदा शांततेचे वातावरण निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७ ——— बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७

Post a Comment

0 Comments